◾खोटले येथील स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव रद्द..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल, दि-०९ :- मालवण तालुक्यातील खोटले येथील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान येथील १४ एप्रील रोजी होणारा स्वामी समर्थ प्रकट दिन ऊत्सव कोरोना मुळे रद्द करण्यात आला आहे. केवळ घरगुती स्वरुपात मठामध्ये धार्मिक विधी होणार असल्याची माहीती मठाधीपती गणेश घाडीगावकर यानी दिली आहे. खोटले येथील मठामध्ये दरवर्षी स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये विविध धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केले जातात. अनेक भक्त जिल्ह्यातुन व जिल्हाबाहेरुन सदर कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने व तो रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लागु केलेले असल्याने १४ एप्रीलचा उत्सव रद्द करण्यात आला आहे.सर्व भक्तानी घरात राहुनच भक्ती करावी. कोणीही भाविकानी यावर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यासाठी खोटले येथे येऊ नये. स्वामी भक्तांनी लोकांची सेवा करतानाच जास्तीत जास्त जेष्ठाना कोरोना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन मठाधिपती गणेश घाडीगावकर यानी केले आहे.