◾ राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी चार चाकी वाहन जप्त करत केली एक लाख ८१ हजार रुपयाची दारू जप्त..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्ग,दि-०८ :- पणदूर सोलापूर येथे राज्य उत्पादन शुल्क कुडाळ व भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी चार चाकी वाहन जप्त करत एक लाख ८१ हजार रुपयाची दारू जप्त केली व दोन आरोपींना ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्काच्या कार्यालयाला चारचाकी गाडीतून दारूची वाहतूक होत असल्याबाबत माहिती मिळाली होती, भरारी पथक व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी संयुक्तरित्या कारवाई करत एकूण १८ लाख ८१ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व दोन आरोपींना अटक केली.

