कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾सिंधुदुर्गात सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी द्यावी ; सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाची मागणी..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-०८ :-  मुंबईसारख्या कोरोना हॉटस्पॉट शहरात बृहन्मुंबई महानगर पालिकेने सुधारित परिपत्रक जारी करून शुक्रवार ते सोमवार २४ तास ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी दिली आहे. मात्र सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्यात सकाळी ७ ते रात्री ८ या काळातच ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविण्यास परवानगी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेवरील जिल्हा आहे. गोव्यात आज लॉकडाऊन नाही. आजही या राज्यातून परतणाऱ्या पर्यटकांना रात्री आठ नंतर काहीच मिळत नाही. तसेच या जिल्ह्यात स्वतःच्या फॅमिलीशिवाय राहणारे बॅचलर अधिकारी, कर्मचारी व शिक्षणासाठी बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या फारमोठी आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही आपल्याकडे २४ तास ऑनलाईन सेवा न मागता ती सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची विनंती आहे. या संदर्भात प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून ही सेवा दिली जाईल या बाबत सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकरयांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे विनंती केली आहे .

प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करून ही सेवा दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!