◾सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र व ग्रामपंचायत मांगवली यांच्या संकल्पनेतून व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..
◾नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-०८ :- सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र व ग्रामपंचायत मांगवली यांच्या संकल्पनेतून व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.१० एप्रिल २०२१ रोजी सकाळी ०८.०० ते ०१.०० या वेळेत ग्रामपंचायत मांगवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी ७०५७५४४६४३ या आपल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान चे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांनी केले.
यावेळी सचिव मंगेश कदम, महेश संसारे , राजेंद्र राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

