कोल्हापूरमहाराष्ट्रशासकीय

◾पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटी राज्यशासनाकडून बरखास्त..

 

◾भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांना धक्का..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कोल्हापूर,दि-०८ :- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्यात आली शासनाने याबाबत आदेश काढले. या समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष व भाजपचे महेश जाधव यांच्यासह सहा सदस्यांचे कार्यकाळ संपुष्टात आला. राज्य सरकारच्या विधी आणि न्यायविभाग यांनी हा आदेश काढला आहे.

कोल्हापुरसह सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ४२ मंदिरांच्या नियंत्रणाची जबाबदारी या समितीकडे होती. राज्यात २०१४ साली भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही पहिली तीन वर्षे या समितीला अध्यक्ष व सदस्यच नव्हते. १६ ऑगस्ट २०१७ रोजी राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, वैशाली क्षीरसागर, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. गेली चार वर्षे या समितीमार्फत कामकाज सुरू होते. मात्र ही समिती बरखास्त करत राज्य शासनाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच धक्का दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!