गोवा येथे होणाऱ्या नाटा परीक्षेला जायला विद्यार्थ्यांना परवानगी
▪️हॉल तिकीटावर प्रवास करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरीन ; प्रेमानंद देसाईंचे प्रयत्न यशस्वी
🖥️ Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴दोडामार्ग : दि. ०८ गोवा येथे होणाऱ्या नाटाच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दाखवून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हिरवा कंदील दिला आहे.
याबाबत सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. नाटाची परीक्षा शनिवारी गोवा येथे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

