आणखीकोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई, दोन जणांवर गुन्हे दाखल…

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. ०८ राज्यात वाढता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवीन नियमानुसार रात्री आठ नंतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देत संचारबंदी लागू केली असताना देखील, काल शहरात रात्री ८ नंतर देखील काही हॉटेल सुरू होती. या हॉटेल व्यवसायिकांवर पोलिसांनी कारवाई केली असून, दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

यामध्ये शहरातील एक हॉटेल असून, एका बीयर शॉपीचा समावेश आहे. तसेच यावेळी पोलिसांनी सक्त ताकीद दिली आहे की, नियमांचे उल्लंघन करून जर यापुढे हॉटेल, बार रात्री आठ नंतर सुरू दिसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!