जुगार अड्यांना आता स्मशानभुमीचा आसरा
▪️जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी जुगार चालतात स्मशानभुमीच्या शेजारी
🖥️ Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग : दि. ०८ स्मशानभूमी म्हटलं की त्या ठिकाणी कोणी फिरकणार नाही याचा फायदा उठवत तीन पत्ती जुगार चालकांनी नामी शक्कल लढवली कुडाळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला, वेंगुर्ला आरवली स्मशानभूमी च्या शेजारी ,कोलगाव स्मशान भूमी च्या शेजारी जुगाराचे अड्डे रात्रीच्या वेळी लॉक डाउन काळातही जोर धरू लागले आहेत.
स्मशानभूमी गावाच्या एका टोकाला असल्याने त्याठिकाणी कोणी फिरकतही नाही, याची संधी उठवत या रात्रीच्या बैठका घेतल्या जात असल्याचे वृत्त आहे. कुडाळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला, वेंगुर्ला ,आरवली स्मशानभूमीच्या शेजारी, तसेच कोलगाव मशानभुमी च्या शेजारी ,लाखोंची उलाढाल होत असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.
लॉक डाउन काळातही मोठ्या प्रमाणात पंटर याठिकाणी गोळा होताना दिसून येत आहे, पोलिसांनाही याची कल्पना नसेल असे बोलले जाते कारण गावाच्या वेशी बाहेर हे जुगार अड्डे सुरू असल्याने त्याचा मागोवा कोणालाही नसतो याचा फायदा उठवत हे तीन पत्ती जुगार अड्डे आरवली, वेंगुर्ला, कुडाळ, कोलगाव, येथे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ,यांची दखल जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

