आणखीकोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक दंडात्मक कारवाई

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. ०७ शहरात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात आज मास्क न वापरता फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी धडक दंडात्मक कारवाई केली आहे. मार्च महिन्यापासून आता पर्यंत एकूण २७१ जणांवर कारवाई करण्यात आली असून, ६८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई सावंतवाडी पोलीस वरिष्ठ निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यावेळी कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस प्रवीण सापळे, सुनील नाईक, सखाराम भोई, पी. आय.पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!