आणखीकोकणशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांव घाटीत कचरा टाकणाऱ्यांवर वनविभागाच्या कॅमेऱ्याची नजर

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी : दि. ०७ मळगांव घाटीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आता वनविभागाच्या कॅमेऱ्याची नजर असणार आहे. वनविभागाने मळगांव घाटीत आठ दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सावंतवाडी शहरातील काही नागरिक मळगांव घाटीत कचरा टाकत होते. ही जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे. मळगांव घाटी कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड बनले होते. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला होता. प्लास्टिक कचऱ्याचा तिथे साठा होत होता. मळगांव घाटीत कचरा टाकणाऱ्यावर कारवाई झाली होती, तरीही कचरा टाकला जात होता.

त्यामुळे वनविभागाने कचरा टाकणाऱ्यावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेरात कचरा टाकताना आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्र गजानन पानपट्टे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!