कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त भागाची सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केली पाहणी..

◾नुकसानग्रस्त भागाचे करण्यात आले पंचनामे..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि-०७ :- केसरी येथे काल झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त भागाची सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. केसरी येथे काल झालेल्या अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे केसरी गावात तसेच धनगरवाडी येथे अनेक घरांना तडाखा बसला. काजू व सुपारी,आंबा,फणस,केळी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचे आज पंचनामे करण्यात आले. यावेळी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे, दाणोली तलाठी सचिन चितारी, आंबोली सर्कल जी.आर.गुरव , दाणोली गावठण पोलीस पाटील सचिन सावंत , केसरी- फणसवडे सरपंच देवेंद्र सावंत, कृषी अधिकारी निकम तसेच केसरी-धनगरवाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सातोळी -बावळाट येथेही दोन ठिकाणी पंचनामे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!