वानिवडे व पावणाई गावातिल शाळांना साबण व सॅनिटायझर वाटप…
🖥️Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग : दि. ०७ ईश्वर सेवा ट्रस्ट व सिंधुदुर्ग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पावणाई शाळेमध्ये मुलांना कोविड संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुण्याची सवय लागण्याच्या दृष्टीने, सर्व विद्यार्थ्यांना साबण व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यावेळी पावणाई शाळेच्या मुख्याध्यापिका बेले मॅडम, वानिवडे शाळेचे मुख्याध्यापक अहिर सर, शिक्षक वृंद, पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर, ईश्वर सेवा ट्रस्ट उपाध्यक्ष श्रीविद्या सरवणकर, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश सरवणकर, जनार्दन सरवणकर व नितीन धुरी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश सरवणकर व श्रीविद्या सरवणकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

