आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास, मंगळवारपासून केशकर्तनालय सुरू करण्याचा निर्णय

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. ०७ कोरोनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने नवे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू केले आहे. त्यात केशकर्तनालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत. केशकर्तनालय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने केशकर्तनाचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे.

त्यामुळे केशकर्तनालय सुरू करण्याची मागणी नाभिक समाजाने केली असून, या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेत सोमवारपर्यंत तोडगा न निघाल्यास. मंगळवारपासून केशकर्तनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी तालुका नाभिक संघटनेने दिला आहे.

यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले आहे. संघटनेचे प्रांतसदस्य चिटणीस, राजन पवार, तालुकाध्यक्ष वैभव चव्हाण, सदानंद पवार, पुरूषोत्तम आकेरकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!