मळेवाड कोंडूरें गावातील अपंग बांधवांकडून सरपंच हेमंत मराठे यांचा सत्कार…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴सावंतवाडी : दि. ०७ मळेवाड कोंडूरें गावातील अपंग बांधवांकडून सरपंच हेमंत मराठे यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या कार्यालयात गावातील अपंग बांधवांची बैठक आयोजित केली होती. यावेळी अपंग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या अपंग संघटनेचे पदाधिकारी प्रा.पाटील उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते हेमंत मराठे यांची ग्रामपंचायत मळेवाड कोडुरे च्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल गावातील अपंग बांधवांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अनंत आजगावकर ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव, ग्राम अधिकारी अनंत गावकर, वसंत शिरसाट, विजय सातार्डेकर, राजन परब आदी उपस्थित होते.

