महाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾हेत येथील गृहस्थाने गळफास लावून केली आत्महत्या..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि-०७ :- हेत राववाडी येथील दिपक बाबू सकपाळ या गृहस्थाने गळफास लावून आत्महत्या केली. दिपक बाबू संकपाळ वय (५०)याबाबत मृताचे वडील बाबू भिकू संकपाळ (वय ८०), यांनी याबाबत वैभववाडी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हेड काँस्टेबल राजू जामसंडेकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. दिपकला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्यांने घरासमोरील फणसाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत मुलगा, वडील असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!