◾भरमसाठ वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाची साटेली-भेडशी करूना सदन जवळ विद्युत खांबाला धडक..
◾विद्युत खांबाचे झाले जागीच दोन तुकडे ; वाहन चालक मात्र वाहन घेऊन फरार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-०७ :- साटेली-भेडशी करूना सदन शेजारी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भरमसाठ वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने एका विद्युत खांबाला मोठ्याने धडक दिली. त्यामुळे विद्युत खांबाचे जागीच दोन तुकडे झाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ते वाहन दोडामार्ग हुन बेळगाव च्या दिशेने जात होते. त्या वाहनाने विद्युत खांबाला धडक देता क्षणी मोठ्याने आवाज आला. नजिक राहणारे व्यक्ती कोणता आवाज झाला हे पाहण्यासाठी येतात तोपर्यंत तो वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला. मात्र त्या गाडीचे काही भाग तुटलेल्या अवस्थेत घटना स्थळी आहेत.

