◾वैभववाडी तालुक्याच्या ठिकाणी चा उद्याचा बाजार बंद ; व्यापारी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर निर्णय..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-०६ :- तालुक्याच्या ठिकाणचा बुधवारचा आठवडी बाजार उद्या भरणार नाही. व्यापारी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. वैभववाडीतही रुग्ण संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी भरणारा आठवडी बाजार उद्या पासून बंद राहणार आहे. शासनाचा आदेश येईपर्यंत हा आठवडी बाजार बंद राहणार आहे. शासनाच्या आदेशानुसार इतर दुकाने सुरू ठेवण्यात येतील. तसेच हाँटेल मध्ये पार्सल सुविधा सुरू राहणार आहे.नियमांची अमलबजावणी न करणा-यावर कारवाई केली जाईल. असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीला पोलीस निरीक्षक अतुल जाधव,मुख्याधिकारी सुरज कांबळे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम व व्यापारी बांधव उपस्थित होते.

