◾मिलींद नाईक यांचेकडून बांदा केंद्र शाळेला आर्थिक मदत..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴 बांदा,दि-०६ :- बांदा नं. १ केंद्रशाळेचा होत असलेला कायापालट पाहून आपले वडील कै .नारायण परशुराम नाईक व कै. परशुराम (दादा) नारायण नाईक यांच्या स्मरणार्थ मिलींद नारायण नाईक यांनी बांदा केंद्रशाळेसाठी भौतिक सुविधा उपलब्ध करणेसाठी दहा हजार एकशे एक रुपयांची आर्थिक मदत मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचेकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. नाईक कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते आपल्या पूर्वजांची आठवण जपण्यासाठी श्री मिलींद नाईक व त्यांची पत्नी पूनम नाईक यांनी शाळेसाठी आर्थिक स्वरूपात मदतीचा हातभार लावला. तसेच भविष्यात शाळेतील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नाईक कुटुंबीयांकडून करण्यात येणार आहे.
बांदा केंद्रशाळेत लोकसहभागातून लाॅकडाऊन कालावधीत रंगरंगोटी व भौतिक सुविधा पूर्ण करणेचे काम पूर्णत्वास येत असून या कालावधीत जवळपास तीन लाखांचा शैक्षणिक उठाव करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, पदवीधर शिक्षिका उर्मिला मौर्ये, रंगनाथ परब, श्री जे. डी. पाटील, हंसराज गवळे उपस्थित होते.
नाईक कुटुंबियांनी केलेल्या या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान केंद्रप्रमुख संदीप गवस व
पालक वर्गाकडून कौतूक करण्यात येत आहे.

