◾डेगवे आंबेखणवाडी येथील “सार्वजनिक ब्राह्मणी तळी” चे नुतणीकरण पत्राशेड व इतर सुशोभिकरणासाठी मदतीने आवाहन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा,दि-०६ :- डेगवे गावातील आंबेखणवाडी येथे वाडीच्या मध्यवर्ती “सार्वजनिक ब्राह्मणी तळी” चे नुतणीकरण पत्राशेड व इतर सुशोभिकरणांस अंदाजे दोन-ते तिन लाख खर्च अपेक्षित आहे. ब्राह्मणीस्थळातील पवित्र कार्यास सर्वांनी कर्तव्य भावनेतून आर्थिक सहकार्य देऊन इतर सामानाच्या खर्चाचा भार किंवा देणगी स्वरूपात देऊन सहकार्य करण्याचे आवाहन समस्थ आंबेखणवाडी ग्रामस्थ व कार्यकारी मंडळाच्या वतीने डेगवे हितवर्धक मंडळ, मुंबई चे सचिव उल्हास देसाई यांनी केले आहे .
या ठिकाणी मे १९८८ मध्यें “सार्वजनिक तुळशीवृंदावन” , मे१९९९ मध्ये पाण्याचेत “जलकुंभ” , २००४ मध्ये सार्वजनिक तळीच्या परीसराच्या भोवताली दगडी कंपाउंड बांधले.२००८मध्ये पश्चिमेच्या एका बाजूची “पत्राशेड” बांधली आहे. आता स्थळाचे नुतणीकरण पत्राशेड व इतर सुशोभिकरणांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी अंदाजे दोन-ते तिन लाख खर्च अपेक्षित आहे.
प्रत्येक ग्रामस्थांनी कमीत कमी देणगी देऊन या कामासाठी आपले अमुल्य योगदान देऊन सहकार्य करावे असे आवाहन करीत आले आहे.व
सदर ब्राह्मणीतिर्थ पत्राशेड व इतर सुशोभिकरण करणांस अंदाजे दोन-ते तिन लाख खर्च अपेक्षित आहे.पुर्वजांनी पाया घातला.आपण त्यांचे रक्षण करुन त्या पवित्रभूमीवर कळस चढवणे यासाठी सार्वजनिक कामास ग्रामस्थांनी,मनापासून आर्थिक हातभार लावावे. श्रध्दा असणा-या,आमच्या आत्या,बहिणी यांनी व अन्य विवाहीत माहेरच्या मुलीनी ,लोकांनी,हितचिंतकानी, आपली बहुमोल देणगी देऊन हा एकदाचा संकल्प पुर्ण करण्यास सहकार्य करावे.
तरी या ब्राह्मणीस्थळातील पवित्र कार्यास डेगवे गावातील सर्वांनी कर्तव्य भावनेतून आर्थिक सहकार्य देऊन ब्राह्मणी स्थळी पत्राशेड व सुशोभिकरणास आर्थिक सहकार्य शामसुंदर गणपत देसाई, आंबेखणवाडी यांच्याकडे करावे. रेती,खडी,माती,सिमेंट,पत्रे,दगड, प्रवेशद्वारा करीता लागणारे साहित्य ,लोखंडी साहित्य ,मजूरी वैगरे इतर सामानाच्या खर्चाचा भार किंवा देणगी स्वरूपात देऊन सहकार्य करावे. असे आवाहन समस्थ आंबेखणवाडी ग्रामस्थ व कार्यकारी मंडळाने केले आहे.

