◾तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तात्काळ कोवीड केअर सेंटर सुरू करावे ; पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-०६ :- तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तात्काळ कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात यावे. अशा सुचना पंचायत समिती सभापती अक्षता डाफळे यांनी आरोग्य अधिका-यांना दिल्या. दरम्यान त्यांनी सांगुळवाडी येथील बंद असलेल्या कोवीड केअर सेंटरची पाहणी केली. या सेंटर परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. पर्यायी आरोग्य कर्मचारी वर्ग तात्काळ नियुक्त करून सदर सेंटर लवकरच चालू करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. बंडगर, आरोग्य सहाय्यक श्री. चव्हाण तसेच वैभववाडी भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष भारती रावराणे, प्राची तावडे, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.
तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या जवळपास 250 झाली आहे. दररोज आठ ते दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळून येत आहेत. त्या पॉझिटिव रुग्णांना सध्या गृहविलगीकरणात ठेवले जात आहे. त्यामुळे संपर्कातील व्यक्तीही कोरोना पॉझिटिव आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोवीड कक्ष चालू होणे फार गरजेचे आहे.

