कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

◾राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ सुधारणा व रुंदीकरण उपक्रमांतर्गत भूसंपादन प्रक्रियेत सांगीर्डे येथील इमारत क्र. ४०५६ चा खोटा व बनावट प्रस्ताव सादर करून शासनाचे पैसे लाटणाऱ्या “परमार ” प्रकरणी फौजदारी कारवाईस दिरंगाई..

 

◾महसूल विभागाच्या साशंकित कारभाराकडे मनसेने वेधलं जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष ..

◾संघटितपणे व संगनमताने केलेल्या भ्रष्ट कारभारावर फौजदारी कारवाईसाठी मनसे आक्रमक..

 🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि-०६ :- कर्तव्यास कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कडक धोरण ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी या मागणी साठी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

कुडाळ सांगीर्डे येथील मांगीलाल परमार भूसंपादन मोबदला प्रकरण फौजदारी कारवाईसाठी मा.उपविभागीय अधिकारी,कुडाळ यांचेकडे मागील ६ महिने कालावधीपासून प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेत कुडाळ सांगीर्डे येथील सर्व्हे न. ६८/२/७० या जमीन मिळकतीतील इमारत क्र.४०५६ बाबत चुकीचा व बनावट प्रस्ताव सादर करून शासनाचा सुमारे ४७,११,६६६ /- (सत्तेचाळीस लाख अकरा हजार सहाशे सहासष्ठ रुपये) एवढा निधी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर संमतीने लाटल्याने त्यांचे वर फौजदारी होवून वसुलीची कारवाई व्हावी अशी यासाठी कुडाळ मनसेने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर केले.यामध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ४५ मीटर ROW क्षेत्रात न येणाऱ्या इमारतीचे खोटे सीमांकन दाखवून खोटा मुल्यांकन अहवालाच्या सादर करून शासनाचे लाखो रुपये निधी लाटल्याप्रकरणी फौजदारी कारवाईस उपविभागीय अधिकारी कुडाळ दिरंगाई करत आहेत असा मनसेने आरोप करत तात्त्काळ फौजदारी व वसुलीची कारवाई व्हावी अशी मागणी केली. एकीकडे प्रकल्पात जमिनी गेलेले प्रकल्पग्रस्त मोबदल्यासाठी शासनाकडे मागील तीन वर्षे याचना करत असून वेळोवेळी आंदोलने देखील करत आहेत तर दुसरीकडे अशी चुकीची व बनावट प्रकरणे तात्काळ मंजूर होवून मोबदला देखील अदा केला जातो ही दुर्दैवाची बाब असून या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईसाठी वेळकाढूपणाचे धोरण न अवलंबिता, भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्याना जिल्हा प्रशासन पाठीशी घालत आहे असा चुकीचा संदेश जनतेमध्ये जावू नये यासाठी संबंधितांवर फौजदारी कारवाईचे आदेश निर्गमित करावेत व कर्तव्यास कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कडक धोरण ठेवून शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचेकडे केली आहे.यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,अमोल जंगले,आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!