आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या मर्यादेतच राहावे – अशोक दळवी

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी : दि. ०६ नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या मर्यादेतच राहावे त्यांना चुकून जे पद मिळाले आहे त्याची शान राखावी उगाच बेताल वक्तव्य करू नयेत सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असे असताना त्यांच्याच निधीचा वापर करून आपणच विकास कामे केली असा बोलबाला ते करत आहेत केसरकरांनी दिलेल्या निधीचा वापर करायचा आणि बेताल वक्तव्य करायची हे योग्य नाही त्यामुळे परब यांनी आपली मर्यादा ओळखूनच बोलावे असा टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आणला आहे.

श्री. परब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आमदार दीपक केसरकर व पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार श्री दळवी यांनी घेतला असून श्री परब यांना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या बाबत बोलताना त्यांनी विचार करावा. श्री परब यांना अपघाताने नगराध्यक्ष पद मिळाले आहे त्या पदाची त्यांनी शांन राखावी आणि मिळालेल्या या पदाचा योग्य वापर करावा असे दळवी म्हणाले.
श्री परब यांना आमदार केसरकर यांच्या वर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी सावंतवाडी शहरासाठी आणला आहे. सावंतवाडी शहराचे आमदार केसरकर आधुनिक शिल्पकार आहेत, असे अशोक दळवी यांनी सांगितले.

आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या आमदार फंडातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे तसेच जिल्हा नियोजन मधून देखील दिला. तीच कामे व उद्घाटने श्री परब यांनी केली आहेत आता तर या ३१ मार्चपूर्वी श्री केसरकर यांनी तीस लाख रुपयांचा निधी शहराच्या विकास कामांसाठी दिला आहे त्यामुळे केसरकर यांनी दिलेल्या निधीचा वापर करायचा आणि केसरकर यांच्या वर बोलायचे हे योग्य नाही, असे दळवी म्हणाले.

श्री परब यांनी आपली मर्यादेतच राहावे श्री केसरकर यांचा शांत, संयमी स्वभावाचे आहेत ते कुणाचा उगाच राग करत नाहीत. अंगावर जात नाहीत जर का कोणी त्यांच्या स्वतःहून अंगावर गेले तर ते शिंगावर घेतल्याशिवाय राहात नाहीत याचा अनुभव खुद्द परब यांच्या नेत्यांना आला आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केसरकरांना अंगावर घेतले आणि त्याची प्रचिती काय झाली हे जनतेला माहीत आहे त्यामुळे परब यांनी आपली मर्यादा ओळखूनच बोलावे आणि मर्यादेतच राहावे, असा इशारा दळवी यांनी दिला आहे.

आमदार केसरकर यांच्या वर तुम्ही बोलत आहात, याचे भान ठेवा तुम्हाला जे काही अल्प कालावधीचे पद मिळाले आहे. ते लोककल्याणासाठी खर्च घाला. उगाच मर्यादेपलीकडे बोलू नका. आमदार केसरकर शांत आहेत याचा अर्थ तुम्ही ते गप्प आहेत असा नव्हे तुम्ही जर उगाच त्यांच्या वाट्याला गेलात तर तुम्हाला ते महागात पडेल त्यामुळे जरा विचार करूनच बोला श्री केसरकरांनी जो निधी दिला आहे त्याचा योग्य वापर करा शहराचा विकास आमदार केसरकर यांच्या मुळेच झाला आहे हे सावंतवाडीकर जनतेला व सर्वांना ज्ञात आहे असे दळवी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!