◾सावंतवाडी कार्यालयात लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई तील दोषीला ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी दि.०६-: ऐपतीचा दाखला देण्यासाठी ४ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वारंग याला ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. ऐपतिचा दाखला देण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक पुरुषोत्तम कृष्णा वारंग ( वय ५२ , सध्या रा. आनंदवन सोसायटी सालईवाडा, सावंतवाडी, मूळ रा.वारंगाची तुळसुली, कालेलकरवाडी कुडाळ) यांनी ४ हजार लाच मगितली होती.याबाबत तक्रारदार महिलेने अँटी करप्शन कडे दाद मागितली होती. वारंग याला ४ हजार रुपयांची लाच घेताना ५ एप्रिल रोजी अँटी करप्शन ने रंगेहाथ पकडले होते. आज वारंग याना जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी.आर.कदम यांनी ९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

