◾राज्य उत्पादन शुल्क विभागाची सावर्डे-कोष्टीवाडी येथे हातभट्टीवर व राजापूरातील वाटुळ येथे गावठी दारु विक्री करणा-या अल्टो कारवर कारवाई..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-०६ :- चिपळुण तालुक्यातील सावर्डे कोष्टीवाडी येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून 97700 रू. किमतीचा मुददेमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत हातभट्टी निर्मुलन कार्यक्रमांतर्गत विभागीय उपआयुक्त वाय.एम.पवार, अधिक्षक डॉ.बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांनी अवैध दारू विरोधात मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत सातत्याने जिल्हयातील अनेक हातभट्टयांवर छापे मारून गावठी हातभट्टी दारूचा मोठा साठा व मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान सावर्डे कोष्टीवाडी ता.चिपळूण येथे हातभट्टी सुरू असल्याची माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या नुसार भरारीपथक व चिपळुण कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळुन ९७७००/ – रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे जवळपास ३८०० लि.रसायन आढळुन आले. यावेळी दिपाली दिलीप वारे वय ४८ वर्षे, रेश्मी रविंद्र वारे वय ४९ वर्षे, मंजिरी मारूती भंडारी वय ३६ वर्षे, अशोक अनंत भंडारी वय ४९ वर्षे सर्व रा.सावर्डे ता.चिपळूण यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दुस-या एका कारवाईत मुंबई-गोवा महामार्गावर गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची खब-या कडून गुप्त माहीती मिळाल्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या लांजा कार्यालयाने वाटूळ येथे उपनिरीक्षक अमित पाडाळकर यांनी सापळा रचला असता गावठी दारूची वाहतूक करणारी ०१ लाल रंगाची मारूती अल्टो कार मिळून आली. या कारवाईत ३०० लि.गावठी दारू जप्त केली व वाहनासह १०२३०० रु.किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक शुभम नरेंद्र पाटील वय २६ वर्षे रा.मिरजोळे यास ताब्यात घेतले. वरील कारवाई उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, उपनिरीक्षक अमित पाडाळकर, भागवत, किरण पाटील, निखील पाटील जवान विशाल विचारे, अतुल वसावे, सावळाराम वड, ओंकार कांबळे, संदीप विटेकर, अनिता नागरगोजे यांनी केली. ‘ कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्हयात लॉकडाउन कालावधीत अवैध गावठी दारूची वाहतूक व विक्री होवू नये म्हणून करडी नजर ठेवणार असल्याचे उपअधिक्षक व्ही.व्ही.वैदय यांनी सांगितले.

