◾सिंधुदुर्ग जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा निर्णय..
◾अन्यथा १५ एप्रिल पासून शासकीय काम बंद आंदोलन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०६ :- शासकीय कामे पूर्ण करूनही निधी ठेकेदारांची करोडो रुपयांची येणेबाकी शासनाकडे आहे. १४ एप्रिलपर्यंत देयके न मिळाल्यास १५ एप्रिलपासून शासकीय कामबंद आंदोलनाचा निर्णय सिंधुदूर्ग जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बैठक संघटनेचे अध्यक्ष श्री विजय प्रभू यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने गेली सातत्याने दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामसडक योजना, पतन विभाग,पाटबंधारे विभाग आदी सर्वच शासकीय विभागातील कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या कामांची करोडो रुपयांची देयके प्रलंबित आहेत,त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर बँकेचे कर्ज त्यावरील व्याज आणि कोविड मुळे झालेले लॉकडावून यामुळे कर्जबाजारी होवून मेटाकुटीस आलेला आहे, असे असतानाही ३१ मार्च अखेर शासनाकडून देयके मिळतील या आशेवर असलेला कॉन्ट्रॅक्टर याही वर्षी निधी न आल्याने निराश व त्रस्त झालेला आहे,आणि म्हणून शासनास जाग यावी याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय कामांची देयके १४ एप्रिल पर्यंत न मिळाल्यास १५ एप्रिल २०२१ पासून सर्वच शासकीय कामे बंद ठेवून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी संतोष कदम, आबाजी सावंत,उमेश म्हाडदलकर,नंदू तावडे,प्रभाकर परब,दिलीप नार्वेकर,रोहित नाडकर्णी, सुशील लोके,आशिष परब, रामु विखाळे, मिलिंद केळुसकर,विद्या केळुसकर, आबा मुंज,सतीश नाईक,सहदेव चव्हाण, मुदस्सर शिरगावकर आदी कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.
याबाबतचे आपल्या सर्व मागण्यांचे निवेदन सर्व विभागातील अधीक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार आहे.

