◾जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा ३० एप्रिल पर्यंत बंद..
◾माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढले आदेश..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०६ :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सिंधुदुर्गातील सर्व माध्यमिक शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी काढला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा ३० एप्रिल बंद ठेवण्याचे आदेश ०४ एप्रिल रोजी निर्गमित केले आहेत. त्यानुसार ०५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिले आहेत. शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यादृष्टीने व्हाट्सअप, मेसेज,इमेल, मोबाईल द्वारे विद्यार्थी व पालकांशी संपर्कात राहावे. पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही शिक्षकाने मुख्यालय सोडू नये असेही आदेशात नमूद केले आहे.

