व्हिडीओ पार्लर खुलेआम सुरू…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली : दि. ०६ 5 एप्रिलपासून, 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर करताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ गेम पार्लर बंद ठेवण्याचे सक्त आदेश काढले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. कणकवली शहरात आज सकाळी पोलिसांनी बाजारपेठेत फिरून जनजागृती करताना काही दुकानेही बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे आठवडा बाजार दिवशी आलेल्या विक्रेत्यांनी आपली भाजी दुकाने बंद केली.
मात्र शहरातील भालचंद्र महाराज रोड वरील युको बँकेखालील व्हिडीओ पार्लरसह, अन्य व्हिडीओ पार्लर खुलेआम सुरू आहेत. व्हिडीओ पार्लरमध्ये मिनी लॉक डाऊन सुरू असतानाही छन छन सुरूच आहे. हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांना नियम शिकवणाऱ्या खाकी वर्दीने शहरात सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दल व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.

