नगरपंचायत प्रशासन, तालुका व्यापारी संघ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक नगरपंचायत सभागृहात पार पडली…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली : दि. ०६ 5 एप्रिलपासून राज्यात सुरू झालेल्या कोव्हीड निर्बंध, विकेंड लॉकडाऊनबाबत पाळावयाचे नियम आणि अत्यावश्यक सेवा याबाबत नगरपंचायत प्रशासन, तालुका व्यापारी संघ आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक नगरपंचायत सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, व्यापारी संघ तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर आदी उपस्थित होते.
बैठकीत अत्यावश्यक सेवा कोणत्या? विनाअत्यावश्यक दुकाने कोणती? याबाबत चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सलून बंद असली, तरी घरी सलून सेवा दिल्यास गुन्हे दाखल करू नयेत. अशी विनंती नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अनावकर यांनी केली.
बांधकाम व्यवसाय सुरू असेल तर त्याला लागणारे इलेक्टरीक साहित्य, हार्डवेअर साहित्य दुकाने बंद ठेवून कसे चालणार? लग्नसराई सुरू आहे. मात्र कापड दुकाने , चप्पल दुकाने बंद ठेवल्यामुळे व्यापाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी मार्गदर्शन करताना, राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत घोषित केलेला मिनी लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, रात्रीची संचारबंदी प्रत्येकाने पाळणे आवश्यकच आहे. दिवसा असलेली जमावबंदी पाळणेही गरजेची आहे.
शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 या वेळेत विकेंडला कडक संचारबंदी आहे. त्याचे कडक पालन करावे असे आवाहन केले. जि दुकाने सुरू असतील, त्यांनी कोव्हीड टेस्ट करणे गरजेचे आहे. बाजारात कुठली दुकाने सुरू ठेवायची, हे नगरपंचायत प्रशासनाने ठरवावे. पोलीस प्रशासन नगरपंचायत सोबत असेल असेही पी. आय. मुल्ला यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य सभापती अभि मुसळे यांनी आर.टी.पी.सी.आर टेस्टचा तुटवडा असून 45 वर्षांखालील कामगारांना इच्छा असूनही, कोव्हीड लस घेता येत नाही. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. सुजित जाधव यांनी लगतच्या जिल्ह्यात ज्याप्रमाणे सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत दुकाने सुरू आहेत.
सावंतवाडी, कुडाळ मध्येही दुकाने सुरू आहेत. चप्पल व्यावसायिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. सोशल डिस्टन्स पाळत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे फुटवेअर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुजित जाधव यांनी सुचवले. राजाध्यक्ष यांनी आर.टी.पी.सी.आर टेस्टचा रिपोर्ट 10 दिवस उलटूनही मिळत नसतील, तर काय करावे? असा सवाल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबीद नाईक, माजी नगरसेवक बंडू गांगण, रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा कोदे, व्यापारी संघ सचिव विलास कोरगावकर, विशाल कामत, राजेश राजाध्यक्ष, राजन पारकर, संतोष काकडे, सुशील पारकर, महेश देसाई, बजाजी, शेखर चव्हाण, शेखर गणपत्ये, तळगावकर आदी उपस्थित होते.

