◾पत्रादेवी मिठगुढी येथे दुचाकी अपघात..
◾दुचाकी अपघातात वाफोलीतील तरुण गंभीररीत्या जखमी
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-०४ :- गोव्यातून वाफोली येथे परतत असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने आत्माराम मोहन गवस (४२, रा. वाफोली टेंबवाडी) हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. सदर अपघात पत्रादेवी मिठगुढी येथे सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. सामाजिक कार्यकर्ते सुशांत पांगम, धीरज भिसे, दीपक पडवळ व शांताराम पार्सेकर यांनी आत्मारामला उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. आत्माराम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची नोंद बांदा पोलीसात करण्यात आली नसल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.

