कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

◾केरवाडीत श्रमदानातून रस्त्याची डागडुजी..

 

◾राजकीय पुढारी मात्र निवडणुका तोंडावर आल्यावर रस्त्याचे आमिष देऊन त्यानंतर मात्र त्याला पध्दतशीरपणे वाटण्याच्या अक्षता लावतात..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : अर्जुन मोर्जे

🎴शिरोडा,दि-४ :- गेली अनेक वर्षे नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेला शिरोडा केरवाडा रस्ता आता चालण्याच्या ही योग्यतेचा राहिला नसून जागो जागी खड्डयांचे साम्राज्य पसरून रस्त्याची चाळण झाली आहे. निवडणुका तोंडावर आल्यावर रस्त्याचे आमिष देऊन त्यानंतर मात्र त्याला पध्दतशीरपणे वाटण्याच्या अक्षता लावल्या जातात ही वस्तुस्थिती आहे.

मात्र ग्रामस्थ आणि पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेता केरवाडीतील जागरूक नागरिकांनी श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेऊन रस्त्याची डागडुजी केली. सदर श्रमादानावेळी सुनील साळगावकर, अरविंद चोडणकर, निवृत्ती मोर्जे, कल्पेश चोडणकर, आशिष तुळसकर, बणी तांडेल तसेच निखिल बटा आणि इतर युवकांनी मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!