आरोग्यकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾वैभववाडी तालुक्यात कोरोनाची संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ..

 

◾पुढील काही दिवस रुग्ण संख्या वाढती राहिल्यास आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर परिस्थिती जाण्याची शक्यता..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴 वैभववाडी,दि-०४ :- तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही दिवस रुग्ण संख्या वाढती राहिल्यास आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर परिस्थिती जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच तालुक्यातील कोवीड केअर सेंटर बंद असल्याने नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची गावागावात आरोग्य यंत्रणेकडून घरभरणी केली जात आहे. त्या पॉझिटिव्ह रुग्णावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतीही गावात यंत्रणा कार्यरत नसल्याने काही रुग्ण मोकाट वावरताना दिसत आहेत. तर बरेचजण त्यांच्या संपर्कात ये-जा करत आहेत.

रविवारी तालुक्यात नव्याने आठ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये नाधवडे ४, नानिवडे २, उंबर्डे १, वैभववाडी १, या गावातील रुग्णांचा समावेश आहे. मागील चार दिवसात जवळपास ३० नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५० इतकी झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या ३५ आहे. त्यातील २९ रुग्ण गृहविलगीकरणात म्हणजेच वाडीतील घरात ठेवण्यात आले आहेत. तर ६ जण ओरोस येथे आहेत. नव्याने आढळून येत असलेले रुग्ण हे संपर्कातील आहेत. कोव्हीड कक्ष सुरू न झाल्यास गावागावात रुग्ण संख्या अजून वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्या व विनामास्क फिरणा-यांवर कोणाचाही अंकुश नसल्याने सर्वजण बिनधास्त वावरत आहेत. शहरात विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईची मोहीम नगरपंचायतने अधिक गतिमान केली पाहिजे. तसेच कोरोना रुग्ण असलेल्या वाडीत अथवा कंटेनमेंट करण्यात आलेल्या वाडीवर पोलिस तैनात करणे गरजेचे आहे. बेजबाबदारपणे वावरणा-यांवर यंत्रणेने अंकुश ठेवून कारवाई न केल्यास भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!