◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले नवीन ११ कोरोना रुग्ण ; शहरात ३ तर ग्रामीण भागातील ८ रुग्ण ; तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि.०४-: सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये ग्रामीण भागात माडखोल धवडकी येथे तीन, माजगाव, मळेवाड , मळगाव, बांदा , सावरवाड येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, शहरात खासकीलवाडा येथे एक तर स्वरूपानंद सोसायटी येथे दोन रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ६५ रुग्ण सक्रिय आहेत.

