◾वैभववाडी तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत होत आहे दिवसेंदिवस वाढ..
◾आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-०३ :- वैभववाडी तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी तालुक्यात नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आढळून आलेल्या रुग्णात नाधवडे-२, कोकिसरे-२, नावळे –१ व एडगांव- १ यांचा समावेश आहे. सर्व रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती वैभववाडी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 239 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या 30 इतकी आहे. पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात विना मास्क फिरणा-यांवर नगरपंचायतची करडी नजर आहे. तर पोलिसही सतर्क झाले आहेत. दंडात्मक कारवाई दोघांकडूनही केली जात आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास मास्क लावावे. अशा सूचना वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत.

