आणखीकणकवलीकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांचं पाठीवरच ओझं या निमित्ताने कमी होणार…

◼️जिल्हा वार्षिक नाविन्यपुर्ण योजना सन २०२० – २१ मधून, ७ लॉकर कपाट शाळेला देण्यात आली…

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांकरिता नुकतीच जिल्हा वार्षिक नाविन्यपुर्ण योजना सन २०२० – २१ मधून एकूण ७ लॉकर कपाट शाळेला देण्यात आली आहेत.

जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेची नुकतीच राज्यातील आदर्श शाळा, तथा मॉडेल स्कुल म्हणुन निवड झाली असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा वार्षिक नियोजनातुन शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे आणि साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र लॉकर सिस्टीम सोय असलेली कपाटे देण्यात आली असल्यामुळे शाळेच्या वैभवात भर पडणार असुन, विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन शालेची गोडी लागणार आहे. तर शाळेच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे.

जिल्हा परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांचं पाठीवरच ओझं या निमित्ताने कमी होणार आहे. प्रत्येक वर्गाला एक या प्रमाणे स्वतंत्र १५ कप्पे असलेली एकुण ७ लॉकर कपाटे शाळेला देण्यात आली असुन, शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी नुकतीच ती ताब्यात घेतली आहेत.

यावेळी पदवीधर शिक्षक संजय राऊळ, पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर, सहायक शिक्षिका स्मिता कोरगावांकर, अलका मोरे, रुपाली पारकर, रेखा लांघी आणि शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक नावीन्यपूर्ण योजनेतुन केंद्र शाळा खारेपाटण नं. १ ला देण्यात आलेल्या लॉकर कपाटबाबत व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गौरी शिंदे यांनी जि. प. चे आभार व्यक्त केले आहेत.


🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!