Tuesday, August 11, 2026
Latest:
आरोग्यमहाराष्ट्ररत्नागिरीशासकीयसामाजिक

◾डॉ.पाटील डेंटल केअर मध्ये अत्याधुनिक ओपीजी मशीन

 

 ◾चिपळूणमध्ये रुग्णांना मिळणार एकाच छताखाली सर्व सुविधा..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-०३ :- शहरातील नगरपालिके समोरील एस आर प्लाझा मध्ये असणाऱ्या डॉ पाटील डेंटल केअर मध्ये अत्याधुनिक ओपीजी मशीन बसविण्यात आल्याने चिपळूण,खेड,गुहागर,दापोली मंडणगड या उत्तर रत्नागिरीतील तसेच अगदी संगमेश्वरमधील सुध्दा रुग्णांना अन्य कोठेही दूरवर न जाता जवळच ही सुविधा उपलब्ध झाली आहे.डॉ चेतन पाटील एम डी एस आणि डॉ सौ तन्वी पाटील बीडीएस इम्प्लांटोलॉजिस्ट यांनी १० वर्षांपूर्वी हे डेंटल क्लिनिक याठिकाणी सुरू करून दातांच्या बाबतीतील समस्या असणाऱ्या रुग्णांना यशस्वी उपचार देऊन तसेच उत्तम मार्गदर्शन करून नावलौकिक मिळविला आहे.

ओपीजी मशिनद्वारे आपल्याला सर्व दात आणि संबंधित हाडांची रचना जसे मॅक्सिल्ला, मॅंडेबल, सायनस, टीएमजे जॉईंट आदीबाबत अचूक माहिती मिळत असल्याने रुग्णांना त्यांचा त्रास दूर होण्यास काय उपचार करावे याबाबत त्वरित योग्य दिशा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.यामुळे रुग्णांना चांगलाच फायदा होणार असल्याचे डॉ पाटील यांनी सांगितले.कराड,रत्नागिरी प्रमाणे ही सुविधा चिपळूण मध्ये देखील उपलब्ध झाल्याने रुग्णांची होणारी गैरसोय दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!