◾पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ; राहुल दुबाले
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-०३ :- पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी असतात . नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केलेच पाहिजे . मात्र पोलीस कर्तव्य बजावत असतापोलिसांवरना त्यात जर अडथळे आणले . त्यांच्यावर हल्ले केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा महाराष्ट्र पोलीस बाईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला आहे . तसेच राहुल दुबाले यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे महाराष्ट्र पोलीस बॉईजसंघटनेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सैफ सुर्वे यांनी रत्नागिरि जिल्ह्यामध्ये याचा जाहीर निषेध केला आहे . प्रसिध्दीसदिलेल्या पत्रकात सैफ सुर्वे यांनी म्हटले आहे की , पोलीसांवर हल्ले करणारे कोणत्याहि राजकीय पक्षांशी संबंधित असो त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे .