महाराष्ट्ररत्नागिरीशासकीय

◾कंत्राटदार महासंघाचे १५ एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलन.. 

 

◾अडीच लाख जण हवालदिल ,छोट्या कंत्राटदारांचे अडकले आठ हजार कोटी

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-०३ :- महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांची आज दि .२ एप्रिल रोजी कंत्राटदारांचे विविध प्रश्न व समस्या बाबतीत राज्यातील पदाधिकारी व कंत्राटदार यांची बैठक झाली . सदर बैठकीत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासमोर संघटनेच्या वतीने अनेक मागण्यांची निवेदने देण्यात आली . पाठपुरावा केला परंतु , शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अडीच लाख जण सध्या हवालदिल आहेत तर छोट्या कंत्राटदारांचे आठ हजार कोटी अडकले आहेत.

त्यामुळे शुक्रवार , दि .१५ एप्रिल पासून राज्यभर सर्व प्रकारचे शासकीय कामबंद आंदोलन व दि .३ मे रोजी राज्यभर भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा राज्य संघटनेच्या वतीने शासनास दिला असल्याची माहिती राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली . सार्वजनिक बांधकाम , ग्रामविकास , जलसंधारण , जलसंपदा , नगरविकास विभागाकडील राज्यातील सर्व कंत्राटदारांची सर्व प्रलंबित देयके देण्यासाठीचा निधी शासनाने १५ एप्रिल २०२१ पूर्वी सर्व विभागाकडे तात्काळ वितरित करण्यात यावा , राज्यातील या सर्व विभागांची नवीन प्रस्तावित कामे सदर कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा केल्याशिवाय काढू नये , तसेच त्यांच्या निविदा प्रक्रिया अजिबात राबवू नये . प्रस्तावित नवीन कामांना शासनाच्या अर्थ विभागाकडून ५० टक्के निधीची तरतूद केल्याशिवाय व मंजुरी मिळाल्या शिवाय पुढील कोणतीही निविदा प्रक्रिया शासनाने अजिबात सुरू करू नये , १० लाखाच्या आतील कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंता वर्ग , ओपन कंत्राटदार वर्ग यांना समप्रमाणात वाटप करावीत . राज्यातील सर्व विभागाकडील कामे करण्यासाठी एकच विभागाची नोंदणीकरण प्रमाणपत्र आवश्यक व बंधनकारक करावे . या पाच मागण्यांची पूर्तता शासनाने १४ एप्रिल पूर्वी करावी अन्यथा १५ एप्रिल पासून राज्यभर कामबंद केले जाईल , असा इशारा देण्यात आला . यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले , संजय मैंद , सुनील नागराळे , निवास लाड , विदर्भ अध्यक्ष सुबोध सरोदे , पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश कडू – पाटील , मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल पाटील , मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश देशमुख , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पांडव , कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश पालरेचा व संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख कौशिक देशमुख आदींसह राज्य कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!