आरोग्यमहाराष्ट्रमुंबईशासकीयसामाजिक

◾कल्याण डोंबिवलीत १८ ठिकाणी सुरू आहे कोवीड लसीकरण ; ६ठिकाणी विनामूल्य तर १२ ठिकाणी सशुल्क

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : तुषार नेरूरकर

🎴कल्याण-डोंबिवली, दि-०२ :-

कल्याण डोंबिवलीतील वाढते कोरोना रुग्ण पाहता केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नविन केंद्र सुरू केली जात आहेत. कल्याण डोंबिवलीत सध्या 18 ठिकाणी कोवीड लसीकरण केले जात असून त्यापैकी 6 शासकीय केंद्रांवर मोफत तर उर्वरित 12 खासगी ठिकाणी सशुल्क लसीकरण केले जात असल्याची माहिती ‘एलएनएन’ला देण्यात आली. आजपासून 45 वर्षे आणि त्यावरील नागरिकांना लसीकरण देण्यासही सुरुवात झाली आहे.

सध्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात 6 शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. “शास्त्रीनगर रुग्णालय” डोंबिवली प.”, “बाई रुक्मिणीबाई रुग्णालय कल्याण प.,” “सावळाराम क्रिडा संकूल डोंबिवली पू.”, “विभागीय रेल्वे रुग्णालय कल्याण पू.”, “प्रबोधनकार ठाकरे शाळा, नेतिवली कल्याण पू.,” आणि “आर्ट गॅलरी लालचौकी कल्याण प.” या 6 शासकीय केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे.

तर पुढील 12 खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्कपणे ( 250 रुपये घेऊन) कोवीड लसीकरण केले जात असल्याचे एलएनएनला सांगण्यात आले. या 12 खासगी रुग्णालयांमध्ये “बाज आर आर हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “एम्स रुग्णालय डोंबिवली पू.”, “श्री महागणपती हॉस्पीटल टिटवाळा पू.”, “इशा नेत्रालय कल्याण प.”, “स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण पू.”, “नोबेल हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “ऑप्टीलाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी ॲन्ड कार्डिएक केअर सेंटर कल्याण प.”, “एसआरव्ही ममता हॉस्पीटल डोंबिवली पू.”, “होलीक्रॉस हॉस्पीटल कल्याण प.”, “श्वास मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कल्याण प.” आणि डॉ.सी.बी वैद्य मेमोरीयल हॉस्पीटल कल्याण प.” या 12 ठिकाणी प्रती डोस रुपये 250/- इतके शुल्क आकारुन ही लस घेण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!