कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾कसाल पंचक्रोशीत बी.एस.एन.एल ची सेवा वारंवार ठप्प..

 

◾नागरिकां मधून नाराजी व्यक्त..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि-०२ :- पंचक्रोशीतील अनेक भागात बी.एस.एन.एल नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नेटवर्कची समस्या तात्काळ न सोडविल्यास बीएसएनएल विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे .गेल्या अनेक वर्षापासून कसाल पंचक्रोशी बीएसएनएलचे लाखो ग्राहक आहेत. परंतु सध्या नेटवर्क गायब होत असलेल्या या समस्यांमुळे अनेक ग्राहक बीएसएनएल पासून दुरावले जात आहेत .प्रत्येक महिन्याला बीएसएनएल रिचार्ज करूनही ग्राहकांना योग्य सेवा बी.एस.एन.एल कडून दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!