◾शौचालच्या टाकीत पडलेल्या दोन म्हैशींना अखेर तीन दिवसानंतर मिळाले जीवदान..
◾जेसीबीच्या साह्याने काढण्यात आल्या शौचालच्या टाकीतून बाहेर..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴 वैभववाडी,दि-०२ :- वैभववाडी पंचायत समितीच्या शौचालय टाकीत पडलेल्या दोन म्हैशींना तीन दिवसानंतर जेसीबीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. एडगांव येथील शेतकरी पांडुरंग पवार व राजाराम पाटील यांच्या मालकीच्या या दोन म्हैशी 29 मार्च पासून हरवल्या होत्या. सदर शेतकऱ्यांनी या म्हैशींची सर्वत्र शोधाशोध केली. पण सापडल्या नाहीत.
शुक्रवारी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना दोन म्हैशी शौचालयाच्या टाकीत पडल्याचे आढळून आले. चौकशी केली असता त्या म्हैशी एडगांव येथील शेतकऱ्यांच्या असल्याचे समजले. सहजासहजी म्हैशी टाकीतून बाहेर येऊ शकत नव्हत्या. उपस्थित ग्रामस्थांनी म्हैशींना दोर बांधत जेसीबीच्या साह्याने अलगत त्या टाकीतून बाहेर काढले. पाण्याविना व्याकुळ झालेल्या त्या म्हैशींना कर्मचाऱ्यांनी पाणी पाजले. पवार व पाटील यांनी संबंधित कर्मचारी तसेच मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले.

