कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

◾पत्रकार भूषण सावंत यांचा आरोग्य सभापती अनिशा दळवी यांच्या हस्ते सत्कार..

 

◾प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने करण्यात आला सन्मान..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-०२ :- महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत यांची निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्या हस्ते भूषण सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

भूषण सावंत गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत यांची निवड झाल्याने त्यांचा दोडामार्ग येथे सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, कोनाळ सरपंच पराशर सावंत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!