◾अखेर दिव्यांग बांधवांच्या प्रयत्नांना यश..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-०२ :- लॉक डाऊन च्या कालावधीत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांना अन्नधान्य व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठा करण्याकरिता आर्थिक सहाय्य देण्यात येणार असे जाहीर करण्यात आले होते. परंतु कित्येक महिने होऊनही या योजनेची कोणती मदत दिव्यांग बांधवांना दिली गेली नव्हती. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने या योजनेचा वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर ती मदत दिव्यांग बांधवांना देण्यात येत आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी केले आहे.

