◾इन्सुलीच्या कालव्याला येत्या दहा दिवसांत पाणी येईल पुन्हा एकदा तिलारी प्रकल्प अधिकारी आजगेकर यांचे आश्वासन..
◾आधी कालव्याला पाणी आणा मगच तुमचे पोट कालवे मारा सरपंच-उपसरपंच आणि शेतकरी-ग्रामस्थ यांचे अधिकाऱ्यांना निवेदन..
◾पाणी आल्याशिवाय पोट कालव्याचे काम करताना दिसाल तर गावाच्या विरोधाला सामोरे जावे लागेल सरपंच यांचा स्वस्तिक कन्स्ट्रक्शनला इशारा..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा,दि-३१:- इन्सुलीतील शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी अचानक ग्रामपंचायत मध्ये येत सरपंच आणि उपसरपंच यांच्या उपस्थितीत तिलारी प्रकल्प अधिकारी यांना फोन करून धारेवर धरले,आठ दिवसांत पाणी येणार म्हणून खोठी आश्वासने देऊन गावाची तुम्ही चेष्ठा करता का ? असे प्रश्न यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत पोट कालव्याचे काम बंद करा अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जा, अशी आक्रमक भूमिका सरपंच-उपसरपंच,शेतकरी तसेच ग्रामस्थ यांनी घेतली.मुख्य कालव्याला गेली १५ वर्षे झाली तरी अजुनही पाणीच येत नाही, मग पोट कालवे काढून शेतीचे नुकसान कशाला करताय आधी मुख्य कालव्याचे पाणी तरी चालु करा मगच पोट कालवे मारा, तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पोट कालव्यासाठी खोदाई केली त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला द्यावा असे निवेदन स्वस्तिक कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.यावेळी तिलारी प्रकल्प अधिकारी आजगेकर यांनी येत्या दहा दिवसांत इन्सुलीत पाणी येईल असे फोनवरून सरपंच यांना आश्वासन दिले.यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर,उपसरपंच काका चराटकर, शेतकरी नितीन राऊळ, महेंद्र सावंत,आप्पा आमडोसकर,औंदुबर पालव,साई राणे,मयुर चराटकर, सुरेंद्र मुळीक स्वामी पेडणेकर,अमोल पालव,देवेंद्र पालव,रामचंद्र नाईक,दादा परब उपस्थित होते.

