कोकणमहाराष्ट्रराजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾कोकिसरे गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्याची सरपंच दत्ताराम सावंत यांनी केली जि.प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या कडे मागणी..

🖥 Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

 🎴 वैभववाडी,दि-३१:- कोकिसरे गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात यावी. कामांसाठी निधी उपलब्ध करा. या मागणीचे निवेदन जि.प. अध्यक्ष सौ. संजना सावंत यांना सरपंच दत्ताराम सावंत यांनी दिले. गावातील शिष्टमंडळाने प्रलंबित विकास कामाबाबत ओरोस येथे संजना सावंत यांची भेट घेत चर्चा केली. आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील सर्व विकास कामे लवकरच मार्गी लावली जातील असे आश्वासन संजना सावंत यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

संजना सावन यांची जि.प.च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरपंच दत्‍ताराम सावंत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, वैभववाडी भाजपा उपाध्यक्ष बाळकृष्ण वाडेकर, कोकिसरे बुथ अध्यक्ष विलास वळंजू, नंदकुमार आमरसकर, ग्रामसेवक संभाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!