◾वैभववाडीत ऐनारी ते ऐनारी फाटा येथे शिवजयंती निमित्त काढण्यात आली भव्य रॅली..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-३१:- सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या, माता-भगीनींसह तरुणी सहभागी होत ‘जय भवानी…जय शिवाजी…छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ऐनारी ते ऐनारी फाटा दरम्यान रॕली काढण्यात आली. चार चाकी वाहनात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती डोळे दिपवणारी होती. अधूनमधून फुलांची पुष्पवृष्टी होत होती. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा उत्साह अशा जबरदस्त वातावरणात सोशल डिस्टेन्सिंगचे पालन करीत शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते जनार्दन विचारे, उपसरपंच संजय कांबळे, बळीराम विचारे, ग्रा. पं. सदस्य विश्राम साईल, वैशाली जाधव, श्रद्धा साईल, तायाराम साईल, चंद्कांत विचारे, विलास जाधव, प्रभाकर तळेकर, लक्ष्मण सुर्वे, धकटू जाधव, सुरेश विचारे, रविंद्र विचारे, रविंद्र भोसले, प्रकाश राठोड, रघुनाथ साईल, श्रीकृष्ण ऊर्फ बाळा साईल आदी शिवभक्त उपस्थित होते.

