◾सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी संस्थानकालीन भिडाची पाईपलाईन फुटली..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,ता.३१:- येथील पालिकेच्यावतीने शहराला पाणी पुरवठा करणारी चिवार टेकडी येथून येणारी संस्थानकालीन मुख्य पाईपलाईन फुटली आहे. ही लाईन भिडाची आहे. तसेच १३० वर्षे जुनी आहे, अशी माहीती पाणी पुरवठा योजनेचे अभियंता भाऊ भिसे यांनी दिली.त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

