आरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात आज नव्याने अकरा कोरोना रुग्ण सापडले ; तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांची माहिती.. 

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी दि.३०-: सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ११ रुग्ण सापडले असून, शहरात ४ तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

या मध्ये शहरात खासकीलवाडा येथे एक, माठेवाडा येथे एक तर सबनीसवाडा येथे दोन रुग्ण सापडले आहेत. तर मळगाव, दाणोली, बावळाट, निरवडे या गावांमध्ये प्रत्येकी एक – एक रुग्ण सापडला आहे. तर सावरवाड येथे तीन रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ४२ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!