◾सावंतवाडी नगरपालिकेकडून घरपट्टी न भरलेल्या नागरिकांवर कडक कारवाई सुरू..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.३० -: मार्च एंडिंग च्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेकडून घरपट्टी न भरलेल्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. नगरपालिकेकडून शहरात जोरदार कारवाई सुरू असून, आज उभा बाजार येथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन मालमत्ता धारकांवर कारवाई करत त्यांची प्रोपर्टी सील करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगरपालिका कार्यालयीन प्रमुख आसावरी शिरोडकर यांनी दिली आहे.

