◾वैभववाडी तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने काढले डोके वर..
◾तालुक्यात आज नव्याने सापडले आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-३०:- वैभववाडी तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मंगळवारी तालुक्यात नव्याने आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आढळून आलेल्या रुग्णात नाधवडे-१, कोकिसरे-२, वैभववाडी-२ व उंबर्डे- ४यांचा समावेश आहे. सर्व रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. अशी माहिती वैभववाडी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात एकूण रुग्ण संख्या २३१ झाली आहे. तर सक्रिय रुग्ण संख्या २३ इतकी आहे. वैभववाडी तालुका कोरोना मुक्त झाला होता. परंतु पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात विना मास्क फिरणा-यांवर नगरपंचायतची करडी नजर आहे. तर पोलिसही सतर्क झाले आहेत. दंडात्मक कारवाई दोघांकडूनही केली जात आहे. प्रत्येकाने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास मास्क लावावे. अशा सूचना वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहेत.

