◾प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी भूषण सावंत यांची निवड..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि.३०:- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सिंधुदुर्ग न्यूजचे मुख्य संपादक भूषण सावंत यांची निवड करण्यात आली आहे.
भूषण सावंत गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. भूषण सावंत संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक किरण बाथम, मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, कोकण प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण महिला प्रदेशाध्यक्षा दिपीका चिपळूणकर, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, समीर बामुगडे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

